www.24taas.com, झी मीडिया, पणजी
तेहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी आणि इतर महत्त्वाच्या साक्षीदारांना आज गोवा पोलिसांनी नोटीस बजावली. तेहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी एका महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तपास करत असलेल्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
चौधरी आणि अन्यर साक्षीदारांना साक्षीसाठी गोवा येथील पोलिस कार्यालयात बोलविले. ही नोटीस ई-मेल
आणि लेखी स्वरूपात पाठविण्यात आली होती. तेजपाल यांच्याविरोधातील हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न चौधरी करत असल्याचा आरोप या महिला पत्रकाराने केला होता. आपल्या स्त्रीवादी भूमिकेबद्दल प्रसिद्ध असलेल्या चौधरी यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
गोवा पोलिसांनी इशान तनखा, शौगत दासगुप्ता आणि जी विष्णु यांना चौकशीची नोटीस बजावली. यांपैकी काही पत्रकारांनी आता तेहलका सोडले आहे. याआधी गोवा पोलिसांनी नवी दिल्लीमध्ये चौधरी व इतर तीन जणांचे निवेदन नोंदविले होते. पुन्हा निवेदन नोंदविण्यासाठी चौधरीसह अन्य साथीदारांना नोटीस बजावली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.