जेव्हा शिक्षिकेचे १६ वर्षाच्या विद्यार्थ्यावर जडलं प्रेम

जेव्हा ४० वर्षीय शिक्षिकेचं १६ वर्षाच्या विद्यार्थ्यावर प्रेम जडतं तेव्हा काय होतं याचं उदाहरण अहमदाबादमध्ये पहायला मिळालं आहे. या शिक्षिकेचे या विद्यार्थ्यासोबत संबंध होतं. याबाबत विद्यार्थ्याच्या घरच्या लोकांना काही माहित पडो याआधीच ही शिक्षिका विद्यार्थ्याला घेवून फरार झाली आहे. 

Updated: Jun 12, 2016, 12:19 PM IST
जेव्हा शिक्षिकेचे १६ वर्षाच्या विद्यार्थ्यावर जडलं प्रेम title=

अहमदाबाद : जेव्हा ४० वर्षीय शिक्षिकेचं १६ वर्षाच्या विद्यार्थ्यावर प्रेम जडतं तेव्हा काय होतं याचं उदाहरण अहमदाबादमध्ये पहायला मिळालं आहे. या शिक्षिकेचे या विद्यार्थ्यासोबत संबंध होतं. याबाबत विद्यार्थ्याच्या घरच्या लोकांना काही माहित पडो याआधीच ही शिक्षिका विद्यार्थ्याला घेवून फरार झाली आहे. 

१० दिवसानंतर या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आलं की, ही शिक्षिका अल्पवयीन मुलाचं वय १८ वर्ष पूर्ण होण्याची ही शिक्षिका वाट पाहत होती. पण सोसायटीमध्ये त्याच्या भेटण्याने आणि एकत्र दिसल्यामुळे लोकांना त्यांच्यावर संशय होईल यासाठी त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.