नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं मंगळवारी तहलका या मॅगझीनचे संस्थापक-संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणात जामीन मंजूर केलाय.
तेजपाल यांनी ३० नोव्हेंबर २०१३ रोजी गोवामध्ये एका हॉटेलात आपल्या महिला सहकाऱ्याच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एच. एल. दत्तू आणि न्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठानं तेजपाल यांना जामीन मंजूर केलाय.
सोबतच, तेजपाल साक्षीदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असं आढळल्यास खंडपीठानं गोवा सरकारला तत्काळ कोर्टाशी संपर्क साधण्याचे आदेश दिलेत. कोर्टानं तेजपाल यांना आपला पासपोर्ट अद्याप खालच्या कोर्टात जमा केला नसल्यास तत्काळ जमा करण्याचेही आदेश दिलेत.
सुप्रीम कोर्टानं तेजपाल यांचा अंतरिम जामीनाचा अवधी एक जुलैपर्यंत वाढवली होती. कोर्टानं १९ मे रोजी त्यांना आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी तीन आठवड्यांचा जामीन मंजूर केला होता. तीन जून रोजी अंत्यसंस्काराशी जोडलेल्या इतर विधी पूर्ण करण्यासाठी हा जामीन २७ जूनपर्यंत वाढवण्यात आला. तेजपाल यांच्यावर १८ फेब्रुवारी रोजी लैंगिक छळाचे आरोप निश्चित करण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.