नवी दिल्ली : जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताजमहलाबाबत भारतात एक वाद निर्माण झाला आहे. ताजमहलाला भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. त्या ताजमहलला धार्मिक दृष्टीने पाहणे कितपत योग्य आहे.
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंदांच्या एका वक्तव्यामुळं असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्या वक्तव्यात ते बोलले की, ताजमहल एक शिवमंदिर आहे. ताजच्या दोन मजले खाली शिवमंदिर आहे आणि ते हिंदूसाठी खुलं केलं पाहिजे.
शंकराचार्यांच्या या वक्तव्यात काही तथ्य आहे का? या वक्तव्याला कोणती ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा पुरावे आहेत का? यांसारखे अनेक प्रश्न इथं उपस्थित होत आहेत.
या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहा हा व्हिडिओ-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.