www.24taas.com, झी मीडिया, सुकमा, छत्तीसगढ/b>
छत्तीसगढच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यांत सीआरपीएफच्या ११ जवानांसह ४ पोलीस शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी या शहिदांना आज श्रद्धांजली वाहिली.
या हल्ल्याबाबत माहिती मिळाली होती, मात्र कोणत्या ठिकाणी हल्ला होईल याची माहिती मिळाली नव्हती, आता या हल्ल्याचा तपास NIA कडे दिल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं. तसंच या हल्ल्याचा निवडणूक कार्यक्रमावर काहीही परिणाम होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला होता. मात्र शहीद जवानांना सरकार केवळ श्रद्धांजलीच वाहणार की नक्षलवाद्यांना सडेतोड उत्तर देणार असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झालाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.