जेव्हा एटीएममधून पडला पैशांचा पाऊस...

प्रामाणिकपणाचं एक उदाहरण तीन विद्यार्थ्यांनी दाखवलंय. एका एटीएम मशीनचा दरवाजा उघडल्यानं निघालेली रक्कम न पळवता या विद्यार्थ्यांनी पोलिसांना फोन केला आणि २४ लाखांची चोरी टळली. 

Updated: Sep 22, 2014, 12:39 PM IST
जेव्हा एटीएममधून पडला पैशांचा पाऊस... title=

हैदराबाद: प्रामाणिकपणाचं एक उदाहरण तीन विद्यार्थ्यांनी दाखवलंय. एका एटीएम मशीनचा दरवाजा उघडल्यानं निघालेली रक्कम न पळवता या विद्यार्थ्यांनी पोलिसांना फोन केला आणि २४ लाखांची चोरी टळली. 

पोलीस उपायुक्त (पश्चिम झोन) व्ही. सत्यनारायण यांनी सांगितलं की, तीन विद्यार्थी शायक लतीफ वली, एसआर शिव दुर्गा प्रसाद आणि जे हरिप्रसाद सीए अखेरच्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. ते सर्व १९ सप्टेंबरच्या रात्री पैसे काढण्यासाठी ते एसआर नगरमध्ये एसबीएच एटीएममध्ये गेले होते. 

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एटीएममधून जेव्हा ते पैसे काढत होते, तेव्हा अचानक त्यांचा हात एटीएमच्या दरवाज्याला लागला आणि दरवाजा उघडला. यात ५०० रुपयांचे बंडल ठेवलेले होते. यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं. 

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून एसबीएच बँकेच्या कर्मचाऱ्यांना आणि एटीएमच्या चाव्या असलेल्यांना संपर्क साधला. पूर्ण रक्कम मोजली २४, ५०, ५०० रुपये होते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जर विद्यार्थ्यांनी पोलिसांना कळवलं नसतं तर ही रक्कम चोरीला जावू शकली असती.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.