नोहटा : श्रीनगरच्या नोहटा पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केलाय. या हल्ल्यात एक पोलीस शहीद झालाय, तर १४ जण जखमी झालेत. पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे.
संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ड्यूडी संपवून पोलीस घरी जात असताना हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या १४ जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.