लालू-नितीशला धक्का, महाआघाडीतून मुलायम सिंहाची माघार

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या महाआघाडीला मोठा धक्का बसलाय. समाजवादी पक्षानं या महाआघाडीतून माघार घेतली असून बिहार निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी वेगळं होण्याचा निर्णय आज जाहीर केला.

Updated: Sep 3, 2015, 01:42 PM IST
लालू-नितीशला धक्का, महाआघाडीतून मुलायम सिंहाची माघार title=

लखनऊ: बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या महाआघाडीला मोठा धक्का बसलाय. समाजवादी पक्षानं या महाआघाडीतून माघार घेतली असून बिहार निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी वेगळं होण्याचा निर्णय आज जाहीर केला.

आणखी वाचा - हे चांगलं काम बिहारमध्ये होतंय, महाराष्ट्रात कधी?

रामगोपाल यादव यांनी सांगितलं की, महाआघाडीमध्ये समाजवादी पक्षाचा अपमान केला गेलाय. जागावाटपावर चर्चा होत असतांना समाजवादी पक्षालाही त्याची माहिती होत होती. मात्र जेडीयू आणि आरजेडीनं आमचा सल्ला घेतला नाही. ही आघाडी सपासाठी फाशीच्या शिक्षेसारखी झाली, म्हणून आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. बिहारमधील इतर पक्षांसोबत संपर्क करत असल्याचंही समाजवादी पक्षानं स्पष्ट केलंय. 

बिहार विधानसभा निवडणुकीत 50 टक्के जागांची मागणी करणारा समाजवादी पक्ष नाराज झाला. समाजवादी पक्षाला केवळ पाच जागा देण्यात आल्या. तर जेडीयू-आरजेडी 100-100 जागा आणि काँग्रेस 40 जागांवर निवडणूक लढणार आहे. तर उर्वरित तीन जागांसाठी जनता परिवारानं राष्ट्रवादी काँग्रेसला आमंत्रित केलंय. पण राष्ट्रवादीनं नकार दिलाय. 

आणखी वाचा - लालू प्रसाद यादव यांनी केली मोदींची मिमिक्री, व्हिडिओ व्हायरल

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.