मोदींच्या सुरक्षेसाठी हायटेक यंत्रणा रेडी

आतंकवाद्यांच्या हिट लिस्टवर असणारे देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या आधी कुठल्याच पंतप्रधानांना जी सुरक्षा देण्यात आली नव्हती, अशी सुरक्षा देण्यात येणार आहे. व्हीव्हीआयपी सिक्युरिटी देणारी यंत्रणा `एसपीजी`ने निर्णय घेतला आहे की, मोदींच्या सुरक्षेसाठी ५०० जावानांचा ताफा तैनात करण्यात येणार आ

Updated: May 19, 2014, 09:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आतंकवाद्यांच्या हिट लिस्टवर असणारे देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या आधी कुठल्याच पंतप्रधानांना जी सुरक्षा देण्यात आली नव्हती, अशी सुरक्षा देण्यात येणार आहे. व्हीव्हीआयपी सिक्युरिटी देणारी यंत्रणा `एसपीजी`ने निर्णय घेतला आहे की, मोदींच्या सुरक्षेसाठी ५०० जावानांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे.
मोदींची सुरक्षा करणारे हे जवान एक विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण घेतलेले असतील. तसेच कुठल्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा, याचं देखील त्यांना योग्य प्रशिक्षण दिलेलं असेल. या विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षणाने मोदींना दिलेली ही सुरक्षा अभूतपूर्व असेल. आता पर्यंत इतर पंतप्रधानांना जितक्या धमक्या आतंकवाद्यांकडून आलेल्या नाही. त्यापेक्षा ही किती तरी पटीने जास्त मोदींना धमक्या आल्या आहेत. या कारणानेच मोदींची सुरक्षा ही अद्भूत असणार आहे.
गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एसपीजी कमांडो हे ग्रुपने राहून मोदींच्या घराला आणि कार्यालयाला घेरा करून ठेवतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.