सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची अचनाक प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 26, 2013, 10:54 PM IST

www.24taas.com, झी मीडया, नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची अचनाक प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अन्न सुरक्षा विधेयकावर चर्चा सुरू असल्यानं आज दिवसभर सोनिया गांधी लोकसभेत होत्या.
लोकसभेत अन्न सुरक्षा विधेयकाच्या मतदानाला आज सोनिया गांधी उपस्थित होत्या. रात्री ९.३० ते १० च्या दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. पुत्र राहुल गांधी आणि केंद्रिय मंत्री कुमार शैलजा यांच्यासोबत बाहेर पडल्या. लोकसभेतून बाहेर पडताना सोनिया गांधींचा तोल जात होता. मात्र कुमार शैलजा यांनी सोनिया गांधींना आधार दिला.
सोनिया गांधी गेले २ दिवस व्हायरल तापाने आजारी आहेत. आज दुपारी अन्न सुरक्षा विधेयकांवर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी लोकसभेत उपस्थित होत्या. त्यानंतर सोनिया गांधी घरी गेल्या. मात्र पुन्हा मतदानासाठी सोनिया गांधी लोकसभेत उपस्थित झाल्या.
सध्या सोनिया गांधींना एम्स हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. त्या ICU मध्ये आहेत. मुलगी प्रियंका आणि जावई रॉबर्ट वाड्रादेखील हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.