पाटणा : सोशल मीडिया हातळणारा नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांना राजकारणात विजयाची चुणूक दाखवणारा सोशल मीडिया गुरु प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्याचा देण्यात आला आहे.
बिहारमधील 'चाणक्य' अशी ओळख झालेले प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिलाय. बिहारमध्ये झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये प्रशांत किशोर यांना धोरण ठरविणे आणि सरकारच्या विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे यासाठी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यासाठी एक अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामध्ये पुढील आदेश मिळेपर्यंत प्रशांत किशोर या पदावर काम करतील असे म्हटले आहे.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवून प्रचार-प्रसारासाठी प्रशांत कुमार यांनी नितीश कुमार यांना मोलाचे योगदान दिले होते. आता प्रशांत किशोर हे पुढील पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी निश्चित केलेले पाच संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करणार आहेत. तसेच बिहारच्या विकास, संबंधित धोरणे, योजना आणि अन्य कार्यक्रमांसंबंधी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
प्रशात किशोर यांनी काय केलेय?
- प्रशांत किशोर हे ३७ वर्षांचे असून त्यांनी संयुक्त राष्ट्र संघासाठी आरोग्य क्षेत्रात काम केले आहे.
- २०११मध्ये भारतामध्ये परतल्यावर त्यांनी राजकीय पक्षांना निवडणूक प्रचार आणि धोरण तयार करण्यासाठी काम करणे सुरू केले.
- २०१२मध्ये त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री बनवण्याचे काम आपल्या हाती घेतले होते.
- लोकसभेच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाला विजय प्राप्त करून देण्यात प्रशांत किशोर यांचा मोलाचा वाटा
- भाजपात मतभेदांमुळे त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासाठी काम केले.