नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांची हत्या झाली होती, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिल्ली पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी दिली आहे.
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा गेल्या वर्षी दिल्लीतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगितलं जात होतं.
मात्र ऑक्टोबरमध्ये पुष्कर यांच्या व्हिसेराच्या चाचणीत त्यांचा मृत्यू विषबाधेमुळं झाल्याचं उघड झालं होतं. त्यामुळं सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूविषशी संशय व्यक्त होत होता. अखेरीस दिल्ली पोलिसांनी तब्बल वर्षभरानंतर पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
एम्सच्या मेडिकल बोर्डानं दिलेल्या अहवालानुसार पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेनं झाला होता. तोंडाद्वारे किंवा इंजेक्शनद्वारे त्यांना विष दिलं गेलं असावं, असं बस्सी यांनी सांगितलं. याप्रकरणी जी आवश्यक कारवाई लागेल ती आम्ही करु, असंही त्यांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.