मुंबई : पार्सलमध्ये बंदूक लपवून इंद्राणी मुखर्जीनं मला एका प्रकरणात फसवलं असा दावा इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर रायनं कोर्टामध्ये केला आहे. श्यामवरनं आपल्या कबुली जबाबामध्ये हा खुलासा केला आहे. सीलबंद लिफाफ्यामध्ये असलेला हा जबाब सीबीआयच्या विशेष कोर्टामध्ये उघडणयात आला. मुंबई उच्च न्यायालयानं तसे निर्देश दिले होते.
हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक केल्यानंतर शीना बोरा हत्याप्रकरणी श्यामवरला ऑगस्ट 2015मध्ये अटक करण्यात आली होती.