www.24taas.com, वृत्तसंस्था, रायगढ/छत्तीसगढ
छत्तीसगढच्या रायपूरमध्ये एका गुरूकुलमध्ये आश्रम संचालकावर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलांच्या पालकांनी याविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय.
पालकांनी आरोप केलाय की आश्रम संचालक रमानंद बऱ्याच काळापासून हे दुष्कर्म करतोय. रायगढचे कलेक्टर मुकेश बंसल यांनी रविवारी याप्रकरणी पाच सदस्यीय चौकशी समिती नेमलीय. एसडीएम के.एस.मडावी यांच्यासह इतर सदस्यांनी तपासाला सुरुवात केलीय.
सलखिया इथं असलेला आर्य विद्या मंदिर या स्वामी गुरुकुल आश्रमामध्ये रात्री नऊ वाजता देवाची पूजा केल्यानंतर संचालक महाशय अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करत होता. हे घाणेरडं कृत्य अनेक काळापासून आश्रमात सुरू होता. स्वामी रमानंद रात्री नऊ वाजता देवाची पूजा केल्यानंतर अल्पवयीन विद्यार्थ्यांना आपल्या खोलीत बोलवायचा आणि दुष्कर्म करायचा.
विद्यार्थ्यांच्या मते जवळपास सहा महिन्यांपासून ते हे कृत्य सहन करत होते. मात्र असह्य झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी फोनकरून आपल्या पालकांना याची माहिती दिली. आश्रमात येवून पालकांनी गोंधळ घातला. संचालकांना बदनामीच्या भीतीनं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पालकांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
आश्रम संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून स्वामी सध्या फरार आहे. या आश्रमामध्ये ३१९ विद्यार्थी शिकत होते. त्यात आदिवासी गरीब विद्यार्थ्यांचाही समावेश होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.