चॅनलला मुलाखत दिल्यानंतर डीएसपीची आत्महत्या, वरिष्ठ आणि मंत्र्यांवर आरोप

एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन  कोडागू जिल्‍ह्याचे डीएसपी एम. के. गणपती (51) यांनी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्‍याचा प्रकार उघडकीस आला. 

Updated: Jul 8, 2016, 06:46 PM IST
चॅनलला मुलाखत दिल्यानंतर डीएसपीची आत्महत्या, वरिष्ठ आणि मंत्र्यांवर आरोप title=

बंगळुरू : एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन  कोडागू जिल्‍ह्याचे डीएसपी एम. के. गणपती (51) यांनी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्‍याचा प्रकार उघडकीस आला. 

या मुलाखतीत त्‍यांनी मंत्री आणि वरिष्‍ठ अधिकाऱ्यांच्‍या जाचाला आपण कंटाळलो असल्‍याचे म्‍हटले होते. त्‍यांनी आत्‍महत्‍येपूर्वी एक पत्रही लिहून ठेवले आह

कितवी आहे आत्महत्या...

विशेष म्‍हणजे कर्नाटकमध्‍ये 3 दिवसांत वरिष्‍ठ पोलिस अधिकाऱ्याची ही दुसरी आत्‍महत्‍या आहे. यापूर्वी मंगळवारी बेळगावचे डीएसपी कलप्पा हंदिबग यांनी आत्‍महत्‍या केली. त्‍यांच्‍यावर 10 लाखांची लाच घेतल्‍याचा आरोप होता.

काय केले होते आरोप....

एम. के. गणपती यांनी कुर्ग जवळ असलेल्‍या मदिकेरीच्‍या एका लॉजमध्‍ये आत्‍महत्‍या केली. गळफास घेतला तेव्‍हा ते गणवेशात होते. शिवाय त्‍यांच्‍या कंबरलेला बंदुकीही होती. या खोलीत एक सुसाइड नोटसुद्धा सापडली.