संसदेतील बजेटचं दुसरं सत्र आजपासून सुरु

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरूवात होतेय. अधिवेशनाच्या या टप्प्याचं कामकाज 12 एप्रिलपर्यंत चालणार आहे.  

Updated: Mar 9, 2017, 07:44 AM IST
संसदेतील बजेटचं दुसरं सत्र आजपासून सुरु title=

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरूवात होतेय. अधिवेशनाच्या या टप्प्याचं कामकाज 12 एप्रिलपर्यंत चालणार आहे.  

जीएसटी प्रणाली लागू करण्यासाठी आवश्यक असणारी तीन विधायके मंजूर करून घेण्याचं सर्वात मोठं आव्हान सरकारपुढे असणार आहे. याशिवाय याच टप्प्यात 31 मार्चच्या आधी अर्थसंकल्पालाही मंजुरी दिली जाईल. 

तत्पूर्वी, आज लोकसभेत महिलांना सहा महिने प्रसुती रजा देण्याबाबतचं विधेयक चर्चा करून मंजूर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 31 जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. 1 फेब्रवारीला अर्थमंत्री अरूण जेटलींनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. आता पुढच्या काही दिवसात या अर्थसंकल्पावर चर्चा होऊन तो मंजूर करण्यात येणार आहे.