एसबीआयकडून ग्राहकांना मोठी खुशखबर

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आलीये. एसबीआयमध्ये खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याबाबत ग्राहकांना दिलासा देण्यात आलाय. 

Updated: Apr 17, 2017, 04:06 PM IST
एसबीआयकडून ग्राहकांना मोठी खुशखबर title=

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आलीये. एसबीआयमध्ये खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याबाबत ग्राहकांना दिलासा देण्यात आलाय. 

एसबीआयमधील कॉर्पोरेट सॅलरी पॅकेज, लहान आणि बेसिक सेव्हिंग अकाऊंट आणि प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत खोलण्यात आलेल्या खातेधारकांना मिनिमम बॅलन्स ठेवण्याबाबतच्या नियमांमध्ये सूट देण्यात आलीये.

1 एप्रिलपासून एसबीआयच्या खात्यांमधील मिनिमम बॅलन्सची सीमा वाढवली होती. ज्याचा परिणाम 31 कोटी खातेधारकांवर झालाय. शहरी भागात एसबीआयच्या खातेधारकांना 5000 रुपये ठेवणे अनिवार्य तर ग्रामीण भागात खातेधारकांना मिनिमम बॅलन्स 2000 रुपये ठेवणे गरजेचे करण्यात आले होते. 

मात्र आता एसबीआयमधील कॉर्पोरेट सॅलरी पॅकेज, लहान आणि बेसिक सेव्हिंग अकाऊंट आणि प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत खोलण्यात आलेल्या खातेधारकांना खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही. एसबीआयने याबाबत ट्विट करुन ही माहिती दिलीये.