'तर सचिन, रेखानं खासदारकीचा राजीनामा द्यावा'

रेखा आणि सचिन तेंडुलकरला कामामध्ये रस नसेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा

Updated: Mar 30, 2017, 07:18 PM IST
'तर सचिन, रेखानं खासदारकीचा राजीनामा द्यावा' title=

नवी दिल्ली : रेखा आणि सचिन तेंडुलकरला कामामध्ये रस नसेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी केली आहे. राज्यसभेमध्ये प्रहरामध्ये बोलताना नरेश अग्रवाल यांनी ही मागणी केली आहे.

राज्यसभेमध्ये नियुक्त केलेल्या १२ खासदारांपैकी सर्वात कमी उपस्थिती सचिन आणि रेखाची आहे. हे दोघंही फारच कमी वेळा राज्यसभेमध्ये दिसले आहेत. त्यामुळे नरेश अग्रवाल यांनी हे वक्तव्य केलं आहे.