बरेली : दिब्रुगडहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी सुपरफास्ट एक्प्रेसमध्ये शनिवारी एक अनोखा किस्सा घडला. अनोखा या अर्थाने कारण रशियन मुलींनी थेट भारतीय युवकांचीच छेड काढली.
यानंतर प्रवाशांचा विरोध वाढत गेल्यामुळे या रशियम मुलींना बरेली स्टेशनवर उतरवण्यात आलं, बिना तिकीट प्रवासाचा दंडही या मुलींकडून वसूल करण्यात आला आहे.
टीव्ही मीडियात आलेल्या बातम्यांनुसार, दिल्ली जाणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये शनिवारी वाराणसीहून दोन रशियन मुली आपल्या भारतीय मित्रांसोबत रेल्वे गाडीत बसल्या.
यानंतर या रशियन युवती अचानक आपल्या मित्रांसोबत अश्लील कारनामे करू लागल्या. पहिल्यांदा प्रवाशांनी परदेशी समजून त्यांच्या या कारनाम्यांकडे दुर्लक्ष केलं, मात्र हा प्रकार वाढत गेल्याने त्यांनी त्यांची तक्रार टीटीईकडे केली.
एका प्रवाशाने या मुलींची तक्रार टीटीई एचएस राणा यांच्याकडे केली, तसेत या मुलींच्या वागण्यावर आक्षेप घेतला. टीटीई राणा यांनी त्यांना अश्लील कारनामे बंद करण्यास सांगितलं, पण त्यांनी त्यांच्याशीच भांडायला सुरूवात केली.
यानंतर राणा यांनी त्यांना तिकीट विचारलं पण त्यांच्याकडे तिकीट नव्हतं, आम्ही दुसऱ्या टीसीकडे प्रवासाचे पैसे दिल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र त्यांच्याकडे तिकीट नसल्याने राणा यांनी त्यांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं, अखेर त्यांना बरेली स्टेशनवर उतरवण्यात आलं. तसेच हजारोंचा दंडही ठोठावला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.