धक्कादायक! मुख्यमंत्र्यांचं शीर आणणाऱ्याला एक कोटीचं बक्षीस

केरळच्या मुख्यमंत्र्यांचं शीर आणणाऱ्याला एक कोटीचं बक्षीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निदर्शनांदरम्यान आंदोलनाचे प्रमुख कुंदन चंद्रकांत केलं आहे.  केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना मारणाऱ्यास त्यांनी बक्षीस जाहीर केले आहे. यामुळे राजकीय खळबळ उडाली. 

Updated: Mar 2, 2017, 03:35 PM IST
धक्कादायक! मुख्यमंत्र्यांचं शीर आणणाऱ्याला एक कोटीचं बक्षीस title=

तिरुअनंतपुरम : केरळच्या मुख्यमंत्र्यांचं शीर आणणाऱ्याला एक कोटीचं बक्षीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निदर्शनांदरम्यान आंदोलनाचे प्रमुख कुंदन चंद्रकांत केलं आहे.  केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना मारणाऱ्यास त्यांनी बक्षीस जाहीर केले आहे. यामुळे राजकीय खळबळ उडाली. 

शाहीद पार्क येथे RSSने निदर्शने केली. त्यावेळी उज्जैनचे खासदार चिंतामण मालवीय, भाजपचे आमदार मोहन यादव आणि RSSचे इतर नेते उपस्थित होते. संघाच्या प्रवक्त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वादग्रस्त विधानांवरून टीकेची झोड उठल्यानंतरही कुंदन चंद्रकांत यांनी आपले वक्तव्य मागे घेतले नाही. जे बोललो आहे ते बरोबरच आहे असे त्यांनी म्हटलं आहे.

एक कोटीचं बक्षीस देण्यासाठी मी माझी मालमत्ता विकेन, असेही ते बोलले. आपले राष्ट्रीयत्व अबाधित राखून हे वक्तव्य केले असल्याचे मत चंद्रकांत यांनी व्यक्त केले आहे.