हम दो हमारे तीन; `आरएसएस`ची नवी घोषणा

हम दो हमारा एक’... कुटुंबनियोजनाच्या योजनेलाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आव्हान दिलंय. छोटं कुटुंब ठेवण्याच्या योजनेचं अंध अनुकरण करत राहिलं तर हिंदू कुटुंबे नामशेष होतील, असा धोका आरएसएसनं तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपानिमित्तानं कोची इथं व्यक्त केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 28, 2013, 03:35 PM IST

www.24taas.com, पीटीआय, कोची
‘हम दो हमारा एक’... कुटुंबनियोजनाच्या योजनेलाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आव्हान दिलंय. छोटं कुटुंब ठेवण्याच्या योजनेचं अंध अनुकरण करत राहिलं तर हिंदू कुटुंबे नामशेष होतील, असा धोका आरएसएसनं तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपानिमित्तानं कोची इथं व्यक्त केलाय.

कॅथलिक कुटुंबांत अधिक मुलांना जन्म देणाऱ्या कुटुंबांना चर्चकडून बक्षीस देण्यात येतं, या मोहिमेचा दाखला देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हिंदूंनाही कुटुंबविस्ताराचा सल्ला दिलाय. मुलांची संख्या मर्यादित न ठेवता मोठ्या कुटुंबाचा नारा दिलाय. कुटुंब छोटे ठेवण्यासाठी नियोजनाचे अंध अनुकरण करीत राहिले, तर हिंदू कुटुंबे नामशेष होण्याचा धोका आहे, असा इशाराही यावेळी दिला गेला. यावर उपाय म्हणजे हिंदू कुटुंबांचा संख्यात्मक आकार वाढवणं, अशी संघाची ठाम धारणा यावेळी व्यक्त केली गेली. हिंदू कुटुंबात आता एका मुलावर समाधान मानण्याचा कल वाढला असून, त्यामुळे हिंदूंच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं संघाचं म्हणणं आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार हिंदूंमध्ये सहा वर्षांपर्यंतच्या मुलांचे प्रमाण १५ टक्के तर मुस्लिमांमध्ये १८ टक्के आहे. त्यामुळे ‘हम दो हमारा एक’ऐवजी ‘हम दो हमारे तीन’ ही योजना हिंदू कुटुंबांनी अंमलबजावणी करावी, असं संघाचे संयुक्त सचिव दत्तात्रय होसबळ यांनी म्हटलंय. मात्र, ‘आरएसएस’च्या या घोषणांवर सर्व स्थरांतून टीका करण्यात येतेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.