नवी दिल्ली : आरबीआय बँकेतून रोख रक्कम काढण्याची मर्यादा वाढवू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार या आठवड्यात रिजर्व्ह बँक कॅश काढण्याची सीमा वाढवू शकते. पैशे काढण्याची मर्यादा २४००० हजारावरुन ४०००० होऊ शकते.
रिजर्व्ह बँक या आठवड्यात नोटिफिकेशन जारी करु शकते. नव्या नोटांचं प्रमाण आता वाढलं आहे. त्यामुळे रिजर्व्ह बँक मर्यादा वाढवू शकते. सरकार देखील ही मर्यादा वाढवण्याच्या निर्णयाच्या समर्थनात आहे. बजेट आधी विरोधकांना टीका करण्याची संधी न देण्याच्या उद्देशाने देखील ही मर्यादा वाढवू शकते.