रेल्वे प्रवास पुन्हा महागला

देशातील लांब पल्ल्यांच्या गाडांच्या तिकीट दरात वाढ होणार असल्याची माहिती मिळतेय. राजधानी, दूरान्तो आणि शताब्दी या प्रमुख गाड्यांच्या तिकिट दरात 15 ते 20 रुपायांनी वाढ होणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 27, 2013, 10:43 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
देशातील लांब पल्ल्यांच्या गाडांच्या तिकीट दरात वाढ होणार असल्याची माहिती मिळतेय. राजधानी, दूरान्तो आणि शताब्दी या प्रमुख गाड्यांच्या तिकिट दरात 15 ते 20 रुपायांनी वाढ होणार आहे.
गाडीतील जेवण महाग झाल्यांन ही भाडेवाढ होणार आहे. लवकरच याबाबतची घोषणा होणार असल्याच रेल्वेप्रशासानाकडून सांगण्यात आलंय. दर वाढीसाठी नियुक्त केलेल्या समिती आणि रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतल्याच सांगण्यात आलंय.
तसेच खाण्या पिण्याविषयी काही तक्रारी असल्यास प्रवाशी 1800-11-321 वर तक्रार नोंदवू शकतात. रेल्वे गाड्यांच्या भाड्यात 22 जानेवारी नंतर झालेली ही दुसरी भाडेवाढ आहे.