www.24taas.com,नवी दिल्ली
रेल्वेच्या भाड्यात आज मध्यरात्रीपासून वाढ होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपला खिसा खाली करावा लागणार आहे. स्लीपर क्लासच्या १००० किलोमीटरसाठी ६० रूपये तर एसी-३च्या तिकिटीसाठी १००० किलोमीटरला १०० रूपये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील रेल्वेत तिकीट आणि पासच्या दरातही वाढ होत आहे.
रेल्वेच्या दरात वाढ करताना स्लीपरसह एसीच्या तिकिट दरात वाढ झाली आहे. या दरवाढीबाबत जानेवारीच्या सुरूवातीला निर्णय घेतला होता. ही दरवाढ आजपासून होत आहे. रेल्वेचा २०१३चा अर्थसंकल्प सादर होण्यास दीड महिना बाकी आहे. त्याआधी रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी सर्व दर्जामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. याचा फटका दररोज प्रवास करणाऱ्यांवर पडणार आहे.
कमीत कमी ३ रूपये असणारे रेल्वेचे तिकिट आता ५ रूपये झाले आहे. तर ६ आणि ७ रूपये असणारे भाडे आता १० रूपये असणार आहे. तर रेल्वेच्या खिशावर आणखी बोजा टाकण्यात आला आहे. सुपरफास्टचा अधिभार थेट १० रूपये करण्यात आलाय.