नवी दिल्ली : बुधवारी, लोकसभेमध्ये सुषमा स्वराज यांच्या उत्तरानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केलं. भाषणांच्या यादीत नाव नसताना उत्फूर्तपणे केलेल्या या भाषणाची वाहवादेखील झाली. मात्र, गांधींचा हा आवेश पोकळ असल्याचंच पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.
हे भाषण ऐनवेळी सुचलेलं वैगरे नव्हतंच. त्यांनी ते भाषण लिहूनच आणलं होतं... गंमत म्हणजे त्यांनी हिंदीमध्ये सुस्साट केलेलं हे भाषण प्रत्यक्षात रोमन लिपीमध्ये लिहून आणलं होतं.
गांधी यांनी केलेल्या भाषणाचा कागदच 'झी मीडिया'च्या हाती लागलाय. गांधीजी के तीन बंदर इथपासून ते सुषमांना तुम्ही चुकीच्या असल्याचं सांगितल्यावर त्यांची नजर खाली कशी गेली, हे सगळं सगळं लिहून आणलेलं भाषण होतं.
आता, राहुल गांधींच्या हातातल्या कागदाचा फोटो वायरल होताना दिसतोय.... यामुळे राहुल गांधींची खिल्ली उडवण्याची संधीही इतरांना आयती मिळालीय.
काय लिहिलं होतं या कागदावर...
लोकांना पीएमला ऐकायचंय, त्यांचं मत जाणून घ्यायचंय, मोदीगेटवर, व्यापम घोटाळ्यावर...
गांधींजींची तीन माकडं
१. खरं न बोलणं
२. खरं ना बघणं
३. खरं ना ऐकणं
हे सगळं राहुल गांधींच्या हातातील कागदावर रोमन लिपीमध्ये लिहिलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.