काँग्रेसला नव संजीवनी देण्यासाठी राहुल गांधींची किसान यात्रा

 गेल्या 27 वर्षांपासून उत्तर प्रदेशातल्या सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसला नव संजीवनी देण्यासाठी आजपासून राहुल गांधी किसान यात्रा काढणार आहेत. यात्रेच्या सुरुवातीला राहुल गांधींसाठी पूर्व उत्तर प्रदेशातल्या देवरिया जिल्ह्यात खाट पंचायतीचं आयोजन करण्यात आलंय.

Updated: Sep 6, 2016, 03:17 PM IST
काँग्रेसला नव संजीवनी देण्यासाठी राहुल गांधींची किसान यात्रा  title=

नवी दिल्ली : गेल्या 27 वर्षांपासून उत्तर प्रदेशातल्या सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसला नव संजीवनी देण्यासाठी आजपासून राहुल गांधी किसान यात्रा काढणार आहेत. यात्रेच्या सुरुवातीला राहुल गांधींसाठी पूर्व उत्तर प्रदेशातल्या देवरिया जिल्ह्यात खाट पंचायतीचं आयोजन करण्यात आलंय.

राहुल गांधींचीही यात्रा दिल्लीपर्यंत जाणार आहे. वाटेत राहुल गांधी उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. राहुल गांधींच्या सोबत कार्यकर्त्यांचं एक पथकही असणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्येवरांवर सरकारी उदासीनता अधोरेखित करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न असेल.