www.24taas.com, झी, मीडिया
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गृहमंत्र्यावर सध्या नाराज असल्याचे समजतंय.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणं आंदोलनात एवढ्या लवकर बोलणी करण्याची गरज नव्हती, असं राहुल गांधी यांना वाटतंय. म्हणून अरविंद केजरीवाल यांचं आंदोलन लवकर संपवल्याबद्दल राहुल गांधी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर नाराज आहेत.
आपच्या आंदोलनाला जनतेच समर्थन मिळत नव्हतं. आप स्वतःच्याच जाळ्यात अडकला होता. असा अंदाज राहुल गांधीनी व्यक्त केला. ह्या प्रकरणासंबंधी अंतिम निर्णयाची माहिती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राहुल गांधीना देण्यात आली नव्हती.
अरविंद केजरीवाल यांचं आंदोलन अवघ्या दीड दिवसात संपलं, दोन पोलीस आधी अधिकाऱ्यांचं निंलबन करण्याचं आश्वासन केजरीवाल यांना देण्यात आलं होतं. दिल्लीच्या उपराज्यपालांनी हे कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर केजरीवाल यांनी आपलं आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.
अरविंद केजरीवाल यांचं रेल्वे मंत्रालयाजवळ धरणं आंदोलन सुरू असतांना, केजरीवाल यांनी दिल्लीत अराजकता निर्माण केल्याची टीका केजरीवाल यांच्यावर होत होती. ती केजरीवाल विरोधकांसाठी जमेची बाजू होती. केजरीवाल यांचं आंदोलन जेवढं लांबलं असतं, तेवढंच ते पुढे नेणं कठीण होतं, कदाचित त्यांचं आंदोलन फसेल, असं अनेक राजकीय धुरंदरांना वाटतं होतं.
मात्र, केंद्रीय गृहमंत्रालयानं अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा कऱण्याची घाई केली, आणि मिळेल ते आश्वासन घेऊन, या दिल्लीचा विजय असल्याचं सांगून अरविंद केजरीवाल यांनी वेळ मारून नेली आणि `आप`लाच विजय घोषित केला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.