भूकंपानंतर १० फूट दक्षिणेला सरकलं काठमांडू शहर

नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या ७.९ तीव्रतेच्या भूकंपानं संपूर्ण जनजीवन विस्कळीत केलं आहे. भूकंपाची तीव्रता एवढी मोठी होती की, मोठ्या प्रमाणावर वित्तहाणी, जीवितहानी तर झालीच मात्र नेपाळमध्ये काही भौगोलिक बदल देखील झाले आहेत. मात्र माउंट एव्हरेस्टच्या उंचीमध्ये कोणताही बदल न झाल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. 

Updated: Apr 28, 2015, 01:11 PM IST
भूकंपानंतर १० फूट दक्षिणेला सरकलं काठमांडू शहर title=

काठमांडू: नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या ७.९ तीव्रतेच्या भूकंपानं संपूर्ण जनजीवन विस्कळीत केलं आहे. भूकंपाची तीव्रता एवढी मोठी होती की, मोठ्या प्रमाणावर वित्तहाणी, जीवितहानी तर झालीच मात्र नेपाळमध्ये काही भौगोलिक बदल देखील झाले आहेत. मात्र माउंट एव्हरेस्टच्या उंचीमध्ये कोणताही बदल न झाल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. 

मीडियाला मिळालेल्या रिपोर्टनुसार, वैज्ञानिकांनी सांगितलं की भूकंपानंतर काठमांडू शहर १० फूट दक्षिण दिशेला सरकलं आहे. तसंच पृथ्वीच्या मोठ्या भूभागातही बदल झाल्याची नोंद आहे. या रिपोर्टमधील माहिती वाडिया भू विज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांनी नासाकडून मिळालेल्या माहितीवर दिली आहे. 

७.९ रिश्टर स्केलच्या भूकंपानं इंडियन प्लेट यूरेशियन प्लेटच्या खाली सरकल्यानं घर्षण होऊन पृथ्वीचा ७२०० चौकिमी भूभाग आपल्या जागेपासून तीन मीटरवर आला आहे. या भूकंपामुळं ७९ लाख टन टीएनटी उर्जा निर्माण झाली होती. ही उर्जा हिरोशिमामध्ये झालेल्या अणूबॉम्ब स्फोटाच्या उर्जेच्या ५०४.४ पटीनं जास्त होती. 

या भूकंपात आतापर्यंत नेपाळमधील ४,३५० नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. ८०००पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.