www.24taas.com, झी मीडिया, गुडगाव
हल्ली मुलींचा देहविक्रीचा बाजार सर्रासपणे अनेक शहरातून चालतो. पण आता मॉलमधील पबनेही अशी अश्लील कामे करण्यास सुरुवास केली आहे. गुडगावमधील पबमध्ये मोठ्या प्रमाणात मुलींचा देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याचं आढळून आलं.
इंग्रजी दैनिक ‘मेल टुडे’ने यासंबंधी तपास केल्यावर या गोष्टीचा पर्दाफाश झाला. मोठे मोठे मॉल, त्यातील उच्चभ्रू वर्गांसाठी असणाऱ्या पबमध्ये ७०० रुपयात ४ ग्लास बीअर आणि डान्स करण्यासाठी मुलगी मिळते. जर मुलीला बाहेर घेऊन जायचे असेल तर त्यासाठी हजार ते दीड हजार मोजावे लागतील.
या मॉलच्या जवळ साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर साधारण ३० दारुची दुकाने आहेत. त्यामुळे नेहमी येथे जवळजवळ सगळ्या दुकांनासमोर गाड्यांची रांग लागते आणि लोक आपल्या आपल्या गाड्यांमध्ये बसून दारू पीत असतात. आणि ही सगळी लोक येथील स्थानिक नागरिक आहेत. जमीनी विकून पैसा कमावतात आणि येथे मजा करण्यासाठी येतात. सहारा मॉलच्या मॅनेजमेंटकडून हरियाणा एक्साइज डिपार्टमेंट आणि टॅक्स डिपार्टमेंटला अशा पबचे परमिट रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.