पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात, आज रात्रीपासून होणार लागू

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा कपात करण्यात आलीय. 

Updated: Apr 1, 2015, 12:02 PM IST
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात, आज रात्रीपासून होणार लागू title=

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा कपात करण्यात आलीय. 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं (आयओसी) बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कपात करण्याची घोषणा केली. नव्या किंमती बुधवारी रात्रीपासून लागू होतील. 

मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल ४९ पैसे तर डीझेल १.२१ पैसे प्रति लीटर स्वस्त झालंय. यामुळे, आता राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल ६० रुपये प्रति लीटर तर डिझेल ४८.५० रुपये प्रति लीटर मिळेल. तर आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल ६७.६५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ५५.८७ रुपये प्रति लीटर मिळेल.

एक एप्रिलपासून नागरिकांना पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये थोडा दिलासा मिळण्याची शक्यता याअगोदरपासूनच व्यक्त केली जात होती. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत घट झाल्याचं ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी म्हटलंय. 

यानंतर सीएनजी १.५ रुपये प्रति किलोग्रॅम आणि पीएनजी १ रुपये प्रती एससीएम कमी होण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.