मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

काळेधन कुबेरांना सरकार काही सवलत देण्याच्या विचारात नाही आहे. सरकारने पंतप्रधान गरीब कल्‍याण योजनासंबंधित मोठी घोषणा केली आहे. जर तुम्हाला याचा लाभ हवा असेल तर त्यासाठी ४९.९ टक्के टॅक्स भरावा लागेल. त्यानंतर एकूण संपत्तीच्या २५ टक्के टॅक्स झिरो इंटरेस्‍ट एकाउंटमध्ये जमा करावा लागेल.

Updated: Dec 29, 2016, 12:14 AM IST
मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय title=

नवी दिल्‍ली : काळेधन कुबेरांना सरकार काही सवलत देण्याच्या विचारात नाही आहे. सरकारने पंतप्रधान गरीब कल्‍याण योजनासंबंधित मोठी घोषणा केली आहे. जर तुम्हाला याचा लाभ हवा असेल तर त्यासाठी ४९.९ टक्के टॅक्स भरावा लागेल. त्यानंतर एकूण संपत्तीच्या २५ टक्के टॅक्स झिरो इंटरेस्‍ट एकाउंटमध्ये जमा करावा लागेल.

या योजनेचा लाभ अशा कोणत्याही व्यक्तींना नाही दिला जाणार जे भ्रष्‍टाचार, बेनामी संपत्ती, मनी लॉड्रिंग, परदेशी मुद्रा नियमांचं उल्‍लंघन, आम्ली पदार्थांची तस्करी या प्रकरणात आरोपी असतील. ही योजना १७ डिसेंबरपासून सुरु झाली आणि ३१ मार्च २०१७ पर्यंत सुरु राहणार आहे.