भाजपमध्ये भूकंप : अडवाणींसह वरिष्ठ नेत्यांची मोदी-शहांवर टीकास्त्र

बिहार निवडणुकीत झालेल्या पराभवावर आता भाजपमध्ये अंतर्गत भूकंप सुरू झाले आहे. यशवंत सिन्हा, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी आणि शांताकुमार यांनी संयुक्त निवेदन देऊन भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 

Updated: Nov 10, 2015, 09:14 PM IST
भाजपमध्ये भूकंप : अडवाणींसह वरिष्ठ नेत्यांची मोदी-शहांवर टीकास्त्र title=

नवी दिल्ली : बिहार निवडणुकीत झालेल्या पराभवावर आता भाजपमध्ये अंतर्गत भूकंप सुरू झाले आहे. यशवंत सिन्हा, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी आणि शांताकुमार यांनी संयुक्त निवेदन देऊन भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 

बिहारमधल्या पराभवाला जबाबदार कोण यावरून आता भाजपमध्ये नाराजांची फौज एकत्र जमायला सुरूवात झालीय. भाजपच्या नेतृत्वावर वरिष्ठ नेते नाराज असल्याचं सूत्र आहे... यशवंत सिन्हा, अरूण शौरी, गोविंदाचार्य हे नेते लालकृष्ण अडवाणींच्या घरी एकत्र जमले.

बिहारच्या पराभवाला सर्व जबाबदार असल्याचे बोलून कोणावर ही जबाबदारी देण्यात आलेली नाही. ज्यावेळी पक्ष विजयी होतो. त्यावेळी त्याचे श्रेय देण्यात येते, पण पराभवाची जबाबदारी कोणी घेतल नाही. त्यामुळे पराभवाची कारणमिमांसा शोधली पाहिजे. 

भाजपा दिल्लीतल्या पराभवानंतर काहीच शिकली नसल्याचे खापरही भाजपातल्या बाजुला टाकल्या गेलेल्या ज्येष्ठांनी नव्या नेत्यांवर फोडले आहे.

लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांताकुमार आणि यशवंत सिन्हा यांनी बिहारमधल्या पराभवासाठी कुणालाच जबाबदार न धरल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे, तसेच तटस्थ समिती नेमून पराभवासाठी कोण जबाबदार आहे याचा शोध घ्यायला पाहिजे असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

केवळ एकपानी हे पत्र असले तरी त्यामध्ये सध्या ज्यांच्या हातात पक्षातील सगळी सूत्रे एकवटली आहेत, त्या अमित शाह आणि नरेंद्र मोदींना योग्य तो संदेश जाईल याची व्यवस्थित काळजी यामध्ये घेण्यात आली आहे.

या चारही नेत्यांना गेल्या वर्षभरात भारतीय जनता पार्टीच्या कामकाजापासून लांब ठेवले गेले आहे. मार्गदर्शक मंडळामध्ये समावेश असलेल्या या ज्येष्ठांनी आज एकत्र येत बिहारच्या पराभवाची मीमांसा केली आणि काही मूठभर नेत्यांनी निवडणुकीची धुरा वाहिली आणि त्यांना जबाबदार धरले पाहिजे अशी मागणी केली.

या धुरीणांनी कुणाचे नाव नमूद केले नसले तरी त्यांचा रोख मोदी आणि शाह यांच्यावर असल्याचे जाणवत आहे. भाजपामध्ये बिहार निवडणुकांवरून विद्यमान आणि माजी अशी फूट पडल्याचे यानिमित्ताने दिसत आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.