फ्री वायफायचा पटना रेल्वे स्थानकावर सर्वाधिक वापर, सर्वाधिक सर्च केलं गेल्या पॉर्न साईट्स

पॉर्न साईट्स पाहण्यासाठी वापरली फ्री वायफय सेवा

Updated: Oct 17, 2016, 07:50 PM IST
फ्री वायफायचा पटना रेल्वे स्थानकावर सर्वाधिक वापर, सर्वाधिक सर्च केलं गेल्या पॉर्न साईट्स title=

नवी दिल्ली : पटना रेल्वे स्टेशनवर एका महिन्यापासून फ्री वायफय सेवा सुरु करण्यात आली. देशातील 23 मोठ्या रेल्वे स्थानकांवर फ्री वायफाय सेवा वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे पण पटना स्थानक यामध्ये पहिल्या स्थानकावर आहे. पण पॉर्न साइट्स पाहण्यासाठी याचा अधिक उपयोग केला गेल्याचं देखील समोर आलं आहे.

देशातील सर्व मोठ्या रेल्वे स्थानकांवर ३ वर्षात फ्री वायफाय सुविधा देण्याची सरकारची योजना असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं होतं. 

जयपूर दुसऱ्या स्थानावर 

रेलटेल कंपनीच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं की, 'फ्री वायफाय सुविधा असणाऱ्या कोणत्याही रेल्वे स्थानकांवर जास्त इंटरनेटचा वापर पटना स्थानकावर केला जातो. रण यामध्ये पोर्न वेबसाईट पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पटना नंतर जयपूर स्थानकावर सर्वाधित इंटरनेट वापरलं गेलं तर बंगळुरु आणि दिल्ली रेल्वे स्थानक अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे.