नवी दिल्ली : दिल्लीत पुन्हा एकदा लाजिरवाणी घटना घडल्यात. दोन पाच वर्षांआतील बालिकांवर गॅंगरेप करण्यात आलाय. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा ऐरणीवर आलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पोलीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरलेय. याबाबत त्यांनी ट्विट केलेय.
अधिक वाचा : दिल्लीत दोन चिमुरडींवर सामूहिक बलात्कार
दोन सामूहिक बलात्कार घटनांच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी दिल्ली पोलीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. महिलांना सुरक्षा पुरवण्यात दिल्ली पोलीस अपयशी ठरले आहेत. बालिकांवरील बलात्काराच्या घटना उघडकीस येत असताना पंतप्रधान आणि त्यांचे नायब राज्यपाल कुठे आहेत, काय करत आहेत, असा हल्लाबोल संतप्त केजरीवालांनी ट्विटरवरून केलाय.
अधिक वाचा : बर्थ-डे पार्टीत मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार
या दोन्ही घटना अतिशय धक्कादायक आणि दु:खदायक असल्याचे केजरीवाल यांनी म्हटलेय. दिल्ली पोलीस महिलांना सुरक्षा पुरवण्यात संपूर्णपणे अपयशी ठरले आहेत, अशी तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय.
एका घटनेत आनंद विहार परिसरात एका पाच वर्षीय बालिकेवर तिच्या शेजाऱ्याने दोन साथीदारांसह सामूहिक बलात्कार केला. पीडित बालिकेचे आई-वडील घरात नसल्याची संधी साधत या तीन नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. ही बालिका गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर दुसऱ्या घटनेत अवघ्या अडीच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही चिमुरडी नांगलोई येथे आपल्या पालकांसोबत रामलीला बघण्यास आली होती. मात्र त्यावेळी तेथे लाईट गेली. याचाच फायदा घेत काहींनी तिचे अपहरण केले. नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर तिला एका बागेत फेकून दिले.
PM sir, give control of delhi police to del govt for one year. If situation does not improve, take it back
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 17, 2015
PM Modi shud either himslf act or give control over Delhi police n public order to elected govt of delhi या खुद करो या दूसरों को करने दो
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 17, 2015
Repeated rape of minors is shameful and worrying. Delhi police has completely failed to provide safety. What are PM n his LG doing?
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 17, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.