आम्ही भ्रष्टाचारावर घाव घालतोय, ते भारत बंद करतायत!

नोटा बंदीच्या निर्णयाला विरोध करणा-यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार हल्ला चढवला आहे.

Updated: Nov 27, 2016, 09:55 PM IST
आम्ही भ्रष्टाचारावर घाव घालतोय, ते भारत बंद करतायत! title=

कुशीनगर : नोटा बंदीच्या निर्णयाला विरोध करणा-यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार हल्ला चढवला आहे. उत्तरप्रदेशातील कुशीनगरमधील सभेत बोलताना मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. आम्ही काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर घाव घालत असताना, काही लोक मात्र भारत बंद करण्यात धन्यता मानत असल्याची टीका मोदींनी केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांनी सोमवारी 'आक्रोश दिना'चं आयोजन केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशात मोदींच्या सभांचे आयोजन करण्यात आलं होतं.