www.24taas.com, नवी दिल्ली
गेल्या काही दिवसांपासून संसदेत गोंधळ सुरू आहे. आजतरी संसदेचं कामकाज चालणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संसदेत आज बारा वाजता पंतप्रधान निवेदन कऱण्याची शक्यता आहे. तर रणनिती आखण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक सुरु आहे.
कोळसा खाण घोटाळ्याप्रकरकणी पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवल्यानं सलग चार दिवस संसदेत कामकाज ठप्प झालं. चर्चा नको पंतप्रधानांचा राजीनामा हवा अशी भूमिका विरोधकांनी कायम ठेवली आहे.
दुसरीकडे सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कॅगनं कोळसा खाण वाटपात एक लाख 86 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचं अहवालात नमूद केलंय. त्यामुळं विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलंय.