पेट्रोलच्या किंमतीत कपात तर डिझेलची किंमत वाढली

मोदी सरकारनं पेट्रोल ग्राहकांना दिलासा दिलाय. सरकारनं पेट्रोलच्या दरांत 1.82 रुपये प्रति लीटर कपात केलीय. तर डिझेलच्या किंमतीत 50 पैसे प्रती लीटर वाढ करण्यात आलीय. नवीन दर शनिवारी रात्रीपासून लागू होतील. 

Updated: Aug 30, 2014, 08:36 PM IST
पेट्रोलच्या किंमतीत कपात तर डिझेलची किंमत वाढली title=

नवी दिल्ली : मोदी सरकारनं पेट्रोल ग्राहकांना दिलासा दिलाय. सरकारनं पेट्रोलच्या दरांत 1.82 रुपये प्रति लीटर कपात केलीय. तर डिझेलच्या किंमतीत 50 पैसे प्रती लीटर वाढ करण्यात आलीय. नवीन दर शनिवारी रात्रीपासून लागू होतील. 

महत्त्वाचं म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात उतरलेल्या किंमती पाहता देशात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यापूर्वी 14-15 ऑगस्टच्या रात्रीपासून पेट्रोल 2 रुपये 38 पैसे प्रती लिटर स्वस्त झालं होतं. 

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान बनल्यानंतर पेट्रोलच्या किंमतीत घट होण्याची ही तिसरी वेळ आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी पेट्रोल 1.09 रुपये स्वस्त आणि डिझेल 50 पैसे प्रती लीटर महाग केलं होतं. तर त्यापूर्वी काही दिवस 60 पैशांनी पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली होती.  

दुसरीकडे, तेल कंपन्यांनी डिझेलच्या किंमतीत वाढ केलीय. डिझेलच्या किंमतीत 50 पैसे प्रति लीटर वाढ करण्यात आलीय. 

नव्या किंमतीनुसार मुंबईत 81.85 रुपये प्रति लिटर तर दिल्लीत 73.25 रुपये होईल.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.