पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ..

रुपयाची होत असलेली घसरगुंडी आणि चढत चाललेला डॉलर सामान्यांच्या खिशाला फारच भारी पडतोय. पुन्हा एकदा पेट्रोलचे वाढलेले भाव सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लावणार आहेत.

Updated: Jul 14, 2013, 06:23 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली
रुपयाची होत असलेली घसरगुंडी आणि चढत चाललेला डॉलर सामान्यांच्या खिशाला फारच भारी पडतोय. पुन्हा एकदा पेट्रोलचे वाढलेले भाव सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लावणार आहेत.
घसरत्या रुपयाचा सर्वात मोठा परिणाम पेट्रोलियम कंपन्यांवर होतो. त्यामुळे पेट्रोलचे भाव आज मध्यरात्रीपासून १.५५ रुपये प्रति लीटर ने वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पेट्रोलसोबतच डिझेलचे भावही लवकरच वाढवण्यात येणार आहेत असे सांगितले जात आहे. गेल्याच महिन्यात म्हणजेच १६ जूनलाही पेट्रोलचे भाव वाढवण्यात आले होते.

चहूबाजूंनी महागाईचा सामना करत असलेल्या सामान्य जनतेला मात्र या दर वाढीने चांगलाच झटका बसणार आहे. रुपयाच्या होत असलेल्या सतत घसरणीमुळे पेट्रोलच्या किमतीत ही वाढ होत आहे. त्यामुळे १.५५ रुपयांनी ही दर वाढ करण्यात आलीय. महत्वाचं म्हणजे गेल्या एक महिन्यापासून पेट्रोलच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे सामान्य जनतेला आता डिझेलच्या वाढीसही तोंड द्यायला सज्ज राहावं लागणार आहे. कारण विशेषज्ञाच्या म्हणण्यानुसार लवकरच डिझेलच्या किंमतीही वाढण्याची घोषणा केली जाणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.