www.24taas.com, नवी दिल्ली
नव्या वर्षातही सरकारकडून सामान्यांना महागाईची शॉक ट्रिटमेंट सुरुच आहे.. नव्या वर्षातला आणखी एक महागाई बॉम्ब फुटला आहे... महागाईच्या वणव्यात पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला आहे... पेट्रोलच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. प्रतिलिटर 35 पैशांनी पेट्रोल महागलं आहे.
मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाली आहे... दुसरीकडे मारुतीच्या कारही आजपासून महागणार आहेत. कंपनीने त्यांच्या सर्व 14 मॉडेल्सच्या किमतीत 1 ते 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मारुतीच्या कारची किंमत 20 हजार रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. गाड्यांच्या कच्चा मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण यामुळे किमती वाढवण्यात आल्याचं कंपनीच्या वतीनं सांगण्यात येतं आहे.
ऑक्टोबर 2012मध्ये मारुतीने कारच्या किमती वाढवल्या होत्या. त्यानंतर ही दरवाढ करण्यात आलीय. या दरवाढीमुळं सामान्यांच्या खिशाला आणखी चाट बसणार आहे.....