खुशखबर, स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल

 आगामी पंधरवाड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांनी १५ मे २०१५ ला पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढविले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत पाच डॉलर प्रति बॅरलने घट झाली होती. 

Updated: Jun 9, 2015, 04:18 PM IST
खुशखबर, स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल title=

नवी दिल्ली :  आगामी पंधरवाड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांनी १५ मे २०१५ ला पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढविले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत पाच डॉलर प्रति बॅरलने घट झाली होती. 

आता प्रति बॅरल किंमत ५९ डॉलर झाली आहे. या पुढेही क्रुड ऑइलच्या किंमती कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात य़ेत आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किंमती तीन रूपये आणि डिझेलच्या किंमतीत अडीच रूपये घट होऊ शकते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.