श्रीनगर : जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी आणि भाजपचं यांच्यात सरकार बनवण्यावरून सूत जळलंय. पीडीपीच्या नेते मुफ्ती मोहमद सईद जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
पुढील दोन दिवसात याबाबत औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. मुफ्ती मोहमद 6 वर्षासाठी मुख्यमंत्री असणार आहेत. मुफ्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहितीही मिळतेय.
पीडीपी आणि भाजप यांच्यात असलेल्या वादग्रस्त मुद्यांवर तोडगा निघाल्यानं हे सूत जुळलं. अनुच्छेत 370बाबत दोन्ही पक्ष राज्यातील लोकांच्या भावनांचा आदर करणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.