पठाणकोट : पठाणकोटच्या एअरफोर्स स्टेशनवर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा गोळीबार सुरु केलाय. आणखी दोन दहशतवादी लपले असण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.
दरम्यान, पठाणकोटच्या वायूसेना तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर कॉम्बिंग ओपरेशन दरम्यान बॉम्ब निकामी करताना झालेल्या स्फोटात एनएसजीचे लेफ्टनंट कर्नल निरंजन ई के शहीद झालेत.
त्यामुळे या हल्ल्यात शहीद झालेल्यांचा आकाडा सातवर पोहचलाय. याशिवाय आतापर्यंत दहा हून अधिक जवान जखमी झालेत.
आज सकाळी रुग्णालयात उपचार घेताना आर्मी डिफेन्स कॉर्पचे 3 जवान शहीद झाले. शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 3 जवान जागीच मृत्यूमुखी पडले.
आज सकाळी एनएसजीचे जवान घटनास्थळी कोम्बिंग ऑपरेशनसाठी दाखल झाले. त्यावेळी त्यांना एक जिवंत हातबॉम्ब सापडला. हाच हात बॉम्ब निकामी करताना लेफ्टनंट कर्नल निरंजन ई के शहीद झाले.
त्यांच्यासोबत पाच ते सहा जवान जखमी झाले. यानंतर साधारण अर्ध्या तासापूर्वी वायूसेना तळावरून पुन्हा एकदा स्फोटाचा आवाज आला. यानंतर एका जवानाला पुन्हा एकदा जखमी अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आलंय.