www.24tass.com , झी मीडिया, नवी दिल्ली
पाकिस्तान एकीकडे मैत्रीचा हात पुढे करण्याची भाषा करते मात्र, दुसरीकडे भारतीय लष्कर चौकीवर गोळीबार करते. आठवड्यात दुसऱ्यांदा गोळीबार केला. आजच्या हल्ल्यात ५ जवान शहीत झालेत. मात्र, भारताकडून कठोर पावलं उचलली गेली नसल्याने आज संसदेत विरोधी खासदारांनी हंगामा केला. सुरक्षेबाबत काय पावले उचलली गेलीत, याची माहिती देण्याची मागणी केली.
पाकिस्तानने सोमवारी रात्री नियंत्रण रेषेजवळ पूंछ भागात भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. घुसखोर पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला केला. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि युनिफाइड कमांडचे प्रमुख ओमर अब्दुल्ला यांनी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तान सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे पाकच्या कृतीमुळे पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, भारताने काहीही कृती केलेली नाही. काँग्रेसप्रणित सरकारचा हा नाकर्तेपण आहे. पाकिस्तानला उत्तर देण्यास पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सरकार असमर्थ ठरले आहे, अशी टीका भाजपचे नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
या आधी जुलै महिन्यात पाकिस्तानी सैन्याने चार-पाच वेळा भारतीय चौक्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यांमध्ये काही भारतीय जवान जखमी झाले होते. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात भारत-पाक चर्चा होणार आहे. यावेळी या हल्ल्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेला जाणार आहेत. यावेळी पाक पंतप्रधान नवाझ शरिफ यांना भेटणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.