पद्म पुरस्कारांची घोषणा... १२७ मान्यवरांचा गौरव!

भारत सरकारनं देशातील तब्बल १२७ जणांना पद्म पुरस्कारानं गौरविलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करताना दोघांना पद्मविभूषण तर २४ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तर १०१ जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 25, 2014, 09:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारत सरकारनं देशातील तब्बल १२७ जणांना पद्म पुरस्कारानं गौरविलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करताना दोघांना पद्मविभूषण तर २४ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तर १०१ जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये, तब्बल २१ पुरस्कार प्राप्त करून महाराष्ट्रानं आपला ठसा उमटवला आहे.

एक नजर टाकुयात.... पद्म पुरस्कारानं गौरविण्यात आलेल्या महाराष्ट्रातील प्रतिभावंत व्यक्तींच्या नावावर...
पद्मविभूषण
डॉ. रघुनाथ माशेलकर आणि योगागुरू बी. के. एस. अय्यंगार यांना पद्मविभूषण जाहीर
पद्मभूषण
* बेगम परवीन सुलताना, शास्त्रीय गायिका
* प्रो. ज्येष्ठराज जोशी, विज्ञान आणि तंत्रज्ञान
* लिएंडर पेस, टेनिसपटू

पद्मश्री
* नयना जोशी, कला
* विजय घाटे, संगीत, तबला
* राम मोहन, फिल्म अॅनिमेशन
* परेश रावल, अभिनेता
* सोनी तारापोरवाला, कला, लेखन
* विद्या बालन, अभिनेत्री
* दुर्गा जैन, सामाजिक कार्यकर्त्या
* शेखर बासू, विज्ञान आणि तंत्रज्ञान
* डॉ. रवी ग्रोवर, विज्ञान आणि तंत्रज्ञान
* रामकृष्ण होसूर, विज्ञान आणि तंत्रज्ञान
* राजेश सरैय्या, व्यापार आणि उद्योग
* प्रताप गोविंदराव पवार, व्यापार आणि उद्योग
* डॉ. रमाकांत देशपांडे, औषध
* डॉ. शशांक जोशी, औषध
* मिलिंद किर्तने, औषध
* डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर पद्मश्री

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.