आज नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच वितरण

सोमवारी नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात हा सोहळा रंगेल. यावेळी ५ पद्मविभूषण, ८ पद्मभूषण आणि ४३ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येतील...

Updated: Mar 28, 2016, 01:46 PM IST
आज नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच वितरण title=

नवी दिल्ली : सोमवारी नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात हा सोहळा रंगेल. यावेळी ५ पद्मविभूषण, ८ पद्मभूषण आणि ४३ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येतील...

देशातल्या विविध क्षेत्रांत योगदान देणा-यांची २०१५ च्या पद्म पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलीय. यात सिनेअभिनेता रजनीकांत, अजय देवगन, प्रियांका चोप्रा,  अनुपम खेर, राम सुतार, उज्ज्वल निकम, सानिया मिर्झा आणि सायना नेहवालसह अनेकांचा समावेश आहे. 

रजनीकांत, श्रीश्री रवीशंकर, धीरूभाई अंबानी, रामोजी राव यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय. तर प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार, अभिनेते अनुपम खेर, गायक उदीत नारायण टेनिसपटू सानिया मिर्झा आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. 

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, दिग्दर्शक मधूर भांडारकर, अभिनेता अजय देवगन, प्रियंका चोप्रा यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झालीय. आयसीटीचे कुलगुरू डॉ. जी डी यादव यांनाही पद्मश्री जाहीर झालाय.