www.24taas.com, झी मीडिया,
आपल्या भडकावू भाषणांसाठी चर्चेत असलेल्या असदुद्दीन ओवेसीनी आणखी एक फतवा काढला आहे. हा सलमान विषयीचा अजब गजब फतवा आहे. ओवेसीनी सलमानचा जय हो पाहू नका, अस आवाहन केलंय.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसोबत पतंग उडवणाऱ्या सलमानच्या जय होवर बहिष्कार घाला. ओवेसीने ऑल इंडिया मजिलिस-ए-इत्तिहादुल मुसलिमीन (एआयएमआयएम) च्या कार्यकर्त्यासमोर सलमानवर तोंडसुख घेतले.
मुसलिम व्होट बँक डोळ्यासमोर ठेवून ओवेसीनी सलमानला लक्ष्य केलंय का ?, तर याचाही ओवेसीनी इन्कार केलाय. तसेच सलमानच्या मुसलमाल असण्याचा आणि आपल्या आवाहनाचा काहीही संबंध नाही, असंही ओवीसी म्हणतोय.
सलमानच्या जागी इतर कोणी असता तरीही आपण हेच बोललो असतो. ओवीसीच्या भाषेत ओवीसी म्हणतो, नरेंद्र मोदी हे `कातिल` आणि `जालिम` आहेत. त्यांना `गुड मॅन` म्हणणाऱ्या सलमानचा निषेध ओवेसीने केला.
भाजप नेता व्यंकय्या नायडुंच्या मते ओवेसी किंवा सलमानला जास्त महत्व देण्याची गरज नाही. सलमानचा जय हो शुक्रवारी रिलीज झाला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.