नवी दिल्ली : नोटाबंदीच्या मुद्यावरुन संसदेत सलग विसाव्या दिवशी विरोधकांचं रणकंदन पाहायला मिळालं.. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आलंय..
लोकसभेत कामकाजाला सुरुवात सुरुवात होताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.. कोणत्याही नियमाशिवाय विरोधक चर्चेसाठी तयार असल्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं.. तर काँग्रेस नोटांच्या हेराफेरीत व्यस्त असल्याचा गंभीर आरोप सरकारकडून करण्यात आला...
राज्यसभेतही नोटाबंदीवरुन गदारोळ झाला. सरकारनं ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. तर नोटबंदीबाबत पंतप्रधान मोदींनी संसदेत येऊन निवेदन यावं अशी मागणी काँग्रेसनं केली..
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्ष संसदेचं कामकाज चालू देत नसल्याचा आरोप राज्यसभेतील काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केलाय.