बिकिनीवर बंदीची भाषा करणारे मंत्रीच बिकिनीत

गोव्याचे लोकनिर्माण मंत्री सुदीन धावलीकर सध्या वादात अडकलेत... सध्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट ‘फेसबुक’वर धावलीकर यांचा ‘बिकीनी’ घातलेला एक फोटो फिरताना दिसतोय.

Updated: Jul 10, 2014, 09:53 AM IST
बिकिनीवर बंदीची भाषा करणारे मंत्रीच बिकिनीत title=

पणजी : गोव्याचे लोकनिर्माण मंत्री सुदीन धावलीकर सध्या वादात अडकलेत... सध्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट ‘फेसबुक’वर धावलीकर यांचा ‘बिकीनी’ घातलेला एक फोटो फिरताना दिसतोय.

अमेरिकेतील एका अनिवासी भारतीयानं हा फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर टाकल्याचं सुदीन धावलीकर यांनी म्हटलंय. त्याच्याविरुद्ध धावलीकर यांनी, आपल्या फोटोसोबत छेडछाड करून आपल्याला बदनाम करण्याचा गुन्हा दाखल केलाय. 

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर बिकिनी घालण्यावर बंदी हवी, असं वादग्रस्त वक्तव्य करून धावलीकर नुकतेच चर्चेत आले होते. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राज्यांतील समुद्रकिनाऱ्यांवर स्विम सूट घालण्यावर बंदी आणण्याच्या वक्तव्यावर काढता पाय घेतला होता. 

पोंडाचे पोलीस उपाधीक्षक दिनराज गोवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गोव्यात जन्मलेल्या सैवियो अल्मीडा याच्याविरुद्ध स्थानीक व्यक्ती प्रदीप बख्ले यांनी तक्रार नोंदवलीय. 

पोलिसांच्या माहितीनुसार, अल्मीडानंच धावलीकर यांचा बिकीनी घातलेला फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता. धावलीकर यांच्या फोटोशी छेडछाड करून त्यांना बिकीनी घातलेल्या अवस्थेत या फोटोत दाखवलं गेलंय. हे प्रकरण सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलंय. यानंतर हे प्रकरण सायबर क्राइम सेलकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.