२ हजारच बदलून मिळतील, लग्न घरात अडीच लाख रुपये मिळतील

सरकारने ५०० आणि हजार रूपयाच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, आज आणखी काही नवीन निर्देश जारी केले आहेत. यात सर्वात महत्वाचं म्हणजे बँकेत आता साडेचार हजार नाही, तर २ हजार रूपयेच बदलून मिळतील. या नियम १८ नोव्हेंबर २०१६ पासून लागू होईल.

Updated: Nov 17, 2016, 05:15 PM IST
२ हजारच बदलून मिळतील, लग्न घरात अडीच लाख रुपये मिळतील title=

नवी दिल्ली  : सरकारने ५०० आणि हजार रूपयाच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, आज आणखी काही नवीन निर्देश जारी केले आहेत. यात सर्वात महत्वाचं म्हणजे बँकेत आता साडेचार हजार नाही, तर २ हजार रूपयेच बदलून मिळतील. या नियम १८ नोव्हेंबर २०१६ पासून लागू होईल.

तसेच ज्याच्या घरी लग्न आहे, त्यांना लग्नासाठी खात्यातून अडीच लाख रूपये काढता येतील, मात्र यासाठी लग्नपत्रिका दाखवणे आवश्यक असणार आहे. 

महत्वाचे मुद्दे

बँकेत आता साडेचार हजार नाही, तर २ हजार रूपयेच बदलून मिळतील
लग्न ज्याच्या घरी आहे, त्यांना अडीच लाख काढता येणार, लग्नपत्रिका दाखवणे आवश्यक
कर्जाच्या रकमेतून २५ हजार रूपये काढता येणार
व्यापारी बँकेतून आठवड्याला ५० हजार रूपये काढू शकतील.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना १० हजार रूपये आगाऊ घेता येतील. ( यात बीएसएफ, आर्मी, रेल्वे कर्मचारी तसेच विविध केंद्रीय सेवांचा समावेश आहे)