नवी दिल्ली : नव्या वर्षात सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीसाठी मुलाखत घेण्याची प्रक्रिया बंद केली जाणार आहे. एक जानेवारीपासून सी आणि डी वर्गातील सरकारी नोकऱ्यांसाठी मुलाखत देण्याची तसेच प्रतित्रापत्र सादर करण्याची गरज नाहीये. त्याशिवायही तुम्ही नोकरी मिळवू शकता.
सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील युवकांना याचा मोठा लाभ होणार आहे. अनेकदा त्यांना आपल्या दस्तावेजांची पडताळणी करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे काही पदांवरील नोकरीकरिता प्रतिज्ञापत्र सादर कऱण्यास सूट दिलीये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी नोकऱ्यांसाठी मुलाखत होणार नसल्याची घोषणा केल्यानंतर या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. आम्ही निर्णय घेतलाय. पुढील वर्षी एक जानेवारीपासून सी आणि डी वर्गातील नोकऱ्यांसाठी मुलाखत होणार नसल्याचे केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलेय.